१) गुणोत्तरो दक्षिणदिकस्थितोऽपि सह्याश्रितोऽपि द्विषतामसह्यः ।वर्वर्ति सर्वर्तुषु रम्यरूपो देशो महाराष्ट्रमिति प्रसिद्धः ॥१॥
अन्वयः दक्षिणदिस्थितः अपि गुणोत्तरः, सह्याश्रितः अपि द्विषताम् असह्यः सर्वर्तुषु रम्यरूपः देश: 'महाराष्ट्रम्' इति प्रसिद्धः वर्वर्ति।
अर्थ : महाराष्ट्र देश जरी दक्षिणदिशेला असला तरी तो गुणांनी श्रेष्ठ आहे. 'सह्य' पर्वताचा आश्रय घेतलेला महाराष्ट्र शत्रूना जिंकण्यास असमर्थ आहे. (शत्रू जिंकू शकत नाहीत.) सर्व ऋतुमध्ये अतिशय रम्य असणारा असा हा महाराष्ट्र देश अतिशय प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण: 'दुसरा कालिदास' असा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेल्या पंडीत वसंत शेवडे महोदयांनी मोठ्या अभिमानाने श्रीदेवेदेवश्वरमहाकाव्यं या पद्यात महाराष्ट्र देशाचे वर्णन केले आहे. ते अतिशय रोचक व सरळ आहे.
महाराष्ट्र देशाने सह्याद्री पर्वताचा आश्रय घेतला आहे. दक्षिण दिशेस असणारा हा महाराष्ट्र शत्रूंना जिंकता येत नाही. या महाराष्ट्रात इयपतू नियमितपणे होतात. हा देश सर्व ऋतूंमध्ये रमणीयच दिसतो. असा हा महाराष्ट्र देश प्रसिद्ध आहे. यातून कविचे शब्दसौष्ठव स्पष्ट होते.
२) गोदावरीरोधसि रामचन्द्रः समाश्रयन् पञ्चवटी मनोज्ञाम् |उवास वन्यामवलम्ब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखं सदारः ||२||
अन्वयः यत्र गोदावरीरोधसि मनोज्ञां पञ्चवर्टी समाश्रयन् सहानुजः सदारः रामचन्द्रः वन्यां वृत्तिम् अवलम्ब्य सुखम् उवास। गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मनोज (रमणीय) पंचवटीचा आश्रय घेऊन श्री रामचंद्राचा धाकटा भाऊ (लक्ष्मण) आणि पत्नी सीता यांच्या सह वनवासी वृत्तीच स्वीकार करून सुखाने राहिले.
स्पष्टीकरण: पंचवटी हा नाशिकनगराचा एक भाग आहे. हा दंडकारण्याच एक भाग आहे असे मानतात. येथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. राम जेव्हा १४ वर्ण वनवासाला निघाला तेव्हा ते या गोदावरी तीरावरील 'पंचवटी' मध्ये राहिले वनवासी वृत्तीचा आश्रय घेऊन श्रीराम, भाऊ लक्ष्मण व पत्नी सीता यांच्यासह पंचवटीत सुखाने निघाले. यातून कवीचे कल्पनासौंदर्य दिसते.
३) तिष्ठन्मयूरेश गणेश: क्लेशानशेषानपि यत्र हन्ति ।
प्रस्तूयते प्रेमपुरे प्रमोदान्मल्लारिपूजासु च येलकोटः॥३॥
अन्वय : यत्र मयूरेशपुरे तिष्ठन् गणेशः अशेषान् क्लेशान् अपि हन्ति |
(यत्र) च प्रेमपुरे मल्लारिपूजासु प्रमोदात् येलकोट: प्रस्तूयते।
अर्थ : येथे मयूरेशपूरात राहणारा गणेश सर्व त्रास कष्ट नष्ट करतो •आणि प्रेमपूरामध्ये मल्लारीपूजेत आनंदाने 'येळकोट येळकोट' अशी स्तुती करतात.
स्पष्टीकरण: श्रीगणेश ती मयूरेशपुरातील प्रसिद्ध देवता आहे. प्रेमपुरात १३ व्या शतकात 'मल्लारिमाहात्म्य' या संस्कृत ग्रंथात 'मल्लारि' देवाचे वर्णन आहे. या देवाची १२ स्थाने वर्णन केलेली आहेत. 'यळकोट' शब्दाचा कर्नाटक भाषेत '७' असा अर्थ आहे. आणि 'कोट' म्हणजे कोटी असा मराठीत अर्थ आहे. मल्लारी राज्याचे ७ कोटी सैन्य होते असे ऐकीवात आहे. मल्लारी राजाने ७ वेळा शत्रुसैन्यास जिंकले म्हणून "यळकोट यळकोट जय मल्हार" अशी विजयी घोषणा भक्त करतात व मल्लारी देवाची स्तुती करतात.
विन्यस्तहस्त: स्वनितम्बबिम्बे कल्पद्रुमो भक्तमनोरथानाम् । तिष्ठत्यपास्य श्रममिष्टकायामनादिकालादिह पाण्डुरङ्गः ॥४॥
अन्वयः श्रमम् अपास्य स्वनितम्बबिम्बे विन्यस्तहस्तः भक्तमनोरथानां कल्पद्रुमः पाण्डुरङ्गः अनादिकालात् इह इष्टकायां तिष्ठति।
अर्थ :- श्रम दूर करून स्वतःच्या कमरेवर हात ठेवलेला, भक्तांचे मनोरथ पुरविण्यात कल्पवृक्ष असणारा पांडुरंग अनादिकालापासून येथे विटेवर उभा आहे.
स्पष्टीकरण : पांडुरंग हा वारकरी लोकांचा देव आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला अनेक लोक पंढरीच्या (विठ्ठलाच्या) दर्शनास जातात. पांडुरंग महाराष्ट्राचे दैवत आहे. तो बारकन्याचे कष्ट दूर करतो. भक्तांची मनोरथे पुरवितो, अनेक वर्षे भक्त लोक मोठ्या भक्तीने कितीही श्रम झाले तरी पायी चारी करतात. त्यातच त्यांना आनंद मिळतो व त्यांचे बारीत झालेले कष्ट पांडुरंग दूर करतो. कल्पवृक्ष जमा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, तसा पांडुरंग सर्व भक्तांना कल्पद्रुमाप्रमाणे वाटतो कारण पांडुरंग त्यांच्या सर्व इच्छा पुरवितो व त्यांचे दुःख दूर करतो.
भक्तजस्तालमृदङ्गनादैगर्जन्मुहविठ्ठल विठ्ठलेति । आपाडमासे प्रतिवर्षमंत्र क्षेत्रं समागच्छति पौण्डरीकम् ॥५॥
अन्ययः अत्र प्रतिवर्षम् आषाढमासे तालमृदङ्गनादेः 'विठ्ठल इतिहुः गर्जन भक्तजः पौण्डीक क्षेत्र समागच्छति।
अर्थ: येथे दरवर्षी आषाढ महिन्यात टाळ आणि मृदंगांच्या नादात, घोषात आवाजात 'विठ्ठल विठ्ठल अशी वारंवार गर्जना करणारा भक्तसमूह पंढरपूर क्षेत्रात जमतो.
स्पष्टीकरण :- पंढरपूरचा 'विठ्ठल हे वारकऱ्यांचे दैवत आहे. वारकरी मोठ्या श्रद्धेने व भक्तीने विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जातात. नाचत विठ्ठल विठ्ठल असा टाळ मृदंगाचा गजर करत डोक्यावर तुळस घेऊन लोक आनंदाने आषाढी कार्तिकीची वारी करतात यावेळी कोणी कोणास निमंत्रण देत नाही तर उत्स्फूर्तपणे लोक दरवर्षी पांडुरंग दर्शनास येतात.
स्नातुं पवित्राम्भसि कृष्णवेण्या द्रष्टुं पदाब्जद्वयमत्रिसूनोः। अजसमागच्छति दूरदूरान्नृसिंहवाटीमिह यात्रिवर्गः ॥६॥
अन्वयः इह कृष्णवेण्या पवित्र अम्भसि स्नातुम् अत्रिसूनोः पदाब्जद्वयं द्रष्टु (च) नृसिंहवाटी दूरदूरात् यात्रिवर्ग: अजखम् आगच्छति।
अर्थ :- येथे कृष्णा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी आणि अत्रिपुत्र श्री दत्तात्रेय याची पदकमळे पाहण्यासाठी नरसोबावाडीत दूरदूरहन यात्री (प्रवासी भक्त) लोकांचे समूह सतत (निरंतरपणे) येत असतात.
स्पष्टीकरण :- महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक धार्मिक आहेत. दत्तस्थान असणाऱ्या नरसिंहपुरात लोक मोठ्या भक्तीने दत्ताच्या दर्शनास येतात. कृष्णा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून पवित्र होतात. दर पौर्णिमेस नरसिंहवाडीत खूप मोठी जत्राच भरते. येथील दत्त स्थान् सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. त्यामुळे नरसोवाडीस तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. लोक दर्शनासाठी (दत्तात्रेयांच्या) आसुसलेले असतात. काही लोक तर दर पौर्णिमेस वारीस दर्शनास जातात.
श्रीत्र्यम्बकेशो घुसणेश्वरो वा यत्र क्वचिद् क्षेत्रमहाबलेशः । भीमाश्रयः शङ्करनामधेयः क्वचिच्छिवो राजति वैद्यनाथः ॥७॥
अन्वयः यत्र क्वचित् त्र्यम्बकेशः (वा) घुसूणेश्वर (वा) क्षेत्रमहाबलेशः (वा) भीमाश्रयः शङ्करनामधेयः (वा) क्वचित् वैद्यनाथ: शिव: (चा) राजति।
अर्थ : येथे क्वचित ठिकाणी त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर किंवा क्षेत्र महाबळेश्वर किंवा भीमाश्रय ही शंकराची नावे आहेत. स्वचित ठिकाणी वैद्यनाथ म्हणूनही शिव शोभतो.
स्पष्टीकरण :- संपूर्ण भारतात १२ ज्योतिर्लिंगापैकी ५ महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी ४ ठिकाणांचा उल्लेख या श्लोकात केला आहे. गौतमी नदीच्या काठावर त्र्यंबकेश्वर आहे. भीमशंकर हे डाकिनी येथे आहे. परळी येथे असणारे वैद्यनाथाचे नावाचे शिवस्थान अति पवित्र आहे.अशी ही सर्व ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत.
महालसाख्यां क्वचिदादधाति यत्र क्वचिद्विन्दति रेणुकाख्याम् लक्ष्मीस्वरूपा क्वचिदादिशक्तिः क्वचिद् भवानी तुलजापुरस्था ॥८॥
अन्वयः- यत्र आदिशक्ति: क्वचित् लक्ष्मीस्वरूपा, क्वचित् तुलजापुरस्था भवानी, क्वचित् महालसाख्याम् आदघाति, क्वचित् रेणुकाख्यां विन्दति ।
अर्थ : येथे आदिशक्ती म्हणातात ती लक्ष्मीस्वरुपात असते. तुळजापूर येथे असणारी 'भवानी देवी हे पण आदिमायेचेच रूप आहे. कोठे कोठे हिला महालसा देवी पण म्हणतात. माहूरगड येथे तिला रेणुकादेवी असे सुद्धा म्हणतात.
स्पष्टीकरण :- आदिमायेची आदिशक्तीची 3 1/2शक्तीपीठे भक्तांची खूप मोठे श्रद्धास्थाने आहेत. पण या श्लोकात ३ नच शक्तिपीठांचे वर्णन केले आहे.
१) कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी
२) माहूरगड येथे असलेली रेणुकादेवी
३) तुळजापूर येथे असलेली भवानीदेवी
महालसा देवीचे स्थान महाराष्ट्रात नेवासे येथे आहे.
संवत्सरारम्भदिने प्रभाते सर्वे ध्वजारोपणमाद्रियन्ते । वितन्वते यत्र जनाः प्रमोदाहोलोत्सवं सद्मनि चैत्रगौर्याः
।।९।।
अन्वयः यत्र सर्वे जनाः संवत्सर आरम्भदिने प्रभाते सद्यनि ध्वजारोपणम् आद्रियन्ते, प्रमोदात् चैत्रगौर्याः दोलोत्सव (च) वितन्वते ।
अर्थ : येथे सर्व लोक वर्षाच्या सुरवातीच्या दिवशी सकाळी आपापल्या घरी गुढी उभी करतात आणि आनंदाने चैत्रागौरीला बसवून तिचा उत्सव साजरा करतात.
स्पष्टीकरण: या श्लोकात चैत्र महिन्यातील १ ल्या दिवसालाच लोक आनंदाने विजयोत्सव साजरा करतात. ते घरोघरी गुढी उभारून या दिवशी श्रीराम १४ वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आले म्हणून लोक आनंदाने घराघरावर गुढ्या तोरणे उभारून आनंद व्यक्त करतात. घरापुढे रांगोळ्या देखील काढतात. तसेच घरात चैत्रगौर बसवून पाळण्यातही कुठे कुठे गौरीला बसवून उत्सव साजरा करतात.
पक्षे सिते भाद्रपदे च मासे गृहे गृहे यंत्र तिथौ चतुर्थ्याम् । प्रवर्तते मृण्मयमूर्तिपूजामहोत्सवः सिद्धिविनायकस्य
||१०||
अन्वयः यत्र भाद्रपदे मासे सिते पक्षे चतुथ्य तिथौ च सिद्धिविनायकस्य मृण्मयमूर्तिपूजामहोत्सवः गृहे गृहे प्रवर्तते।
अर्थ : येथे भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला घरोघरी सिद्धिविनायकाची मातीची मूर्ती आणून तिचा पूजेचा उत्सव मोठ्या आनंदाने केला जातो.
स्पष्टीकरण: चैत्र महिन्यात गुढी उभारून आनंद व्यक्त केल्यावर मोठा सण येतो तो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी सिद्धि विनायकाची मातीची मूर्ती स्थापन करून तिचा उत्सव साजरा करतात. या उत्सवात सर्वजण जातीभेद, लहान थोर इ. सर्व विसरून सर्वजण एकत्र येतात व वैर असेल तर संपवतात.
निर्वर्त्य पूजाविधिमायुधानां नीराजनां वाजिविभूषणं च । व्रजन्ति सायं विजयादशम्यां सीमानमुलघितुमत्र लोकाः ।।११।।
अन्वयः अत्र लोका: पूजाविधिम्, आयुधानां नीराजनां वाजिविभूषणं च निर्वर्त्य विजयादशम्यां सायं सीमानम् उल्लधितुं व्रजन्ति ।
अर्थ : येथील लोक पूजाविधी शस्त्रास्त्रे व घोड्यांच्या विभूषणांनाओबाळून परत फिरून विजया दशमीस (दसऱ्याला) संध्याकाळी सीमोल्लघानासाठी जातात. येथे लोक शस्त्रांची निराजनाने पूजा करून घोड्यांना दागिन्यांनीसिद्ध करून विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी सीमोल्लंघनास जातात.)
स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील देवदेवतांचे वर्णन करून झाल्यावर महाकवी पंडीत वसंत शेवडे महोदयांनी येथील उत्सवांचेही वर्णन केले आहे. दसरा सणाला लोक सायंकाळी सीमोल्लंघनास जातात. वर्षाऋतू मध्ये लढाया थांबलेल्या असतात व दसन्याला सीमोलंघन करून त्या परत सुरु होतात. म्हणून आयुधे साफ करून त्यांची खंडेनवमीस वा दसऱ्याला पूजा करुन घोड्यांची ,आभूषणे ठिकठाक करून आयुधांस सर्व लोक सीमोल्लंघनास सज्ज होतात.
वृपोत्सवः श्रावणमासि यंत्र कोजागरी शारदपीर्णिमायाम् । साधानत्रिपुरस्य दाहो विशिष्यते कार्तिकपौर्णमास्याम्
।।१२।।
अन्वयः यत्र श्रावणमासि वृषोत्सव:, शारदपौर्णिमायां कोजागरी, कार्तिक पौर्णमास्यां सम्पद्यमानः त्रिपुरस्य दाहः विशिष्यते ।
अर्थ: येथे (महाराष्ट्रात) श्रावण महिन्यात बैलपोळा, शरद पौर्णिमा (शरद ऋतु मधील) पौर्णिमेला कोजागिरी आणि कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचे दहन प्रामुख्याने होतो.
स्पष्टीकरण: श्रावण महिन्यातील 'बैलपोळा' हा सण प्रामुख्याने शेतकरी वर्गात अधिक चालतो. या दिवशी बैलांना विश्रांती देतात. औताला वा गाडीला जुंपत नाहीत. त्यांची पूजा करून त्यांना सजवून रंगवून त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात. संध्याकाळी बैलांची मोठी वाजत गाजत मिरवणूक काढून हा सण साजरा केला जातो. आश्विन व कार्तिक या २ महिन्यात शरद ऋतू असतो त्या वेळी 'कोजागिरी' सण साजरा करतात. या वेळी चंद्र पूर्ण स्थितीत असतो. चंद्राची पूजा करतात. घरातल्या मोठ्या मुलाला ओवाळतात. त्याला नवीन कपडे करतात व अटीव दूध सर्व नातेवाईकांना बोलावून त्यांना पिण्यास देतात आणि कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचे दहन करतात. त्याचा बेगडी पुतळा करून त्याला जाळतात.
त्रिपुर हा तारकासुरांच्या पुत्रापैकी एक आहे. यांनी ब्रह्मदेशाकडून अमेध शहरे मागून घेतली ती सोने, रूपे लोखंड यांची असून आकाश, अंतरिक्ष व पृथ्वी यावर ही अनुक्रमे होती. तिघांना मिळून ‘त्रिपुर' म्हणतात. ती असह्य झाली म्हणून शंकराने त्यांना जाळले.